राहुल गांधी म्हणतात भारतीय अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था, भाजपाने थेट आकडेवारीच मांडली

Foto
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला ङ्गमृत अर्थव्यवस्थाफ असर संबोधणार्‍या काँग्रेस नेते राहुल गंध यांना भारतीय जनता पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, २०२७ मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पदनाचा विकासदर ७.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. या आकडेवारीचा दाखल देत भाजपाने राहुल गांधी यांच्या विधानांवर टीका केली आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त ङ्गदी प्रिंटनेफ दिले आहे.

भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) ङ्गएक्सफवर पोस्ट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ङ्गराहुल गांधी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत म्हणतात; पण गोल्डमन सॅक्सचे अंदाज त्यांचे दावे खोदून काढतात,फ असे भंडारी यांनी म्हटले आहे.

चीन, अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारताचा विकासदर अधिक?
गोल्डमन सॅक्सच्या अंदाजाचा संदर्भ देताना भंडारी यांनी २०२७ मधील विविध अर्थव्यवस्थांच्या संभाव्य विकासदराची आकडेवारी मांडली. त्यांच्या पोस्टनुसार, भारताचा विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तुलनेत चीनचा विकासदर ४.५ टक्के, अमेरिकेचा २.४ टक्के, तर युरो क्षेत्राचा ०.९ टक्के राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था ङ्गनाजूकफ अर्थव्यवस्थांच्या गटातून बाहेर पडून जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनल्याचा दावाही भंडारी यांनी केला. भारताच्या आर्थिक विकासाचा प्रवास बदलला असल्याचे सांगत त्यांनी ङ्गपुढे आणि अधिक प्रगतीच्या दिशेनेफ अशी प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधींकडून केंद्राच्या आर्थिक धोरणांवर सातत्याने टीका
दरम्यान, राहुल गांधी यांनी गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचा आरोप करत त्यांनी अनेकदा मृत अर्थव्यवस्थाफ असा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेल्या टीकेचा संदर्भ देत राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशिवाय इतर सर्वांना भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती माहीत असल्याचे सांगत त्यांनी अर्थव्यवस्था ङ्गमृतफ झाल्याची टीका केली होती.